डीजे चालक व मालकांवर सातारा पोलिसांची कठोर कारवाई; ७ गुन्हे दाखल


सातारा : मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक, सातारा व मा. श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशांचे पालन व्हावे यासाठी सातारा शहर पोलीस व शाहूपुरी पोलीस ठाण्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालक व मालकांविरोधात कठोर कारवाई केली आहे.

या कारवाईअंतर्गत एकूण ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी शाहूपुरी पोलीस ठाण्यात ४ तर सातारा शहर पोलीस ठाण्यात ३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ (लोकसेवकाने जाहीर केलेल्या आदेशाचे उल्लंघन) तसेच कलम २८५ (सार्वजनिक मार्गात अडथळा निर्माण करणे) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शाहूपुरी पोलीस ठाणे


गुन्हा क्र. २२१/२६

आरोपी : रोहित बाचल

रोहन गोरे (साऊंड मालक)

कलम : भारतीय न्याय संहिता २२३


गुन्हा क्र. २२२/२६

आरोपी : आरिफ मुलाणी (साऊंड मालक)

कलम : भारतीय न्याय संहिता २२३


गुन्हा क्र. २२३/२६

आरोपी : सूरज दिनकर पवार (साऊंड मालक)

कलम : भारतीय न्याय संहिता २२३


गुन्हा क्र. २२४/२६

आरोपी : अभिषेक रवींद्र चव्हाण (साऊंड मालक)

कलम : भारतीय न्याय संहिता २२३


सातारा शहर पोलीस ठाणे


गुन्हा क्र. ६१३/२६

आरोपी : विवेक सुनील भोसले (साऊंड मालक)

कलमे : भारतीय न्याय संहिता २२३, २८५


गुन्हा क्र. ६१३/२६

आरोपी : प्रतीक सुनील माने (साऊंड मालक)

कलमे : भारतीय न्याय संहिता २२३, २८५


गुन्हा क्र. ६१३/२६

आरोपी : सूरज सुधीर सपकाळ (साऊंड मालक)

कलमे : भारतीय न्याय संहिता २२३, २८५


याशिवाय, संबंधित डीजे चालक व मालकांविरुद्ध ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत.

सातारा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन करू नये आणि सार्वजनिक शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य टाळावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या