पणदरे येथे वर्षावासानिमित्त दर रविवारी धम्म प्रवचन

नालंदा बुद्ध विहारात रविवारपासून कार्यक्रम; पंचक्रोशीतील बौद्ध बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन




पणदरे ,दि.१२-: वर्षावासानिमित्त नालंदा बुद्ध विहार, अशोक नगर/सचिन नगर, पणदरे येथे रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ पासून दर रविवारी सायंकाळी ७ वाजता धम्म प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पणदरे पंचक्रोशीतील सर्व बौद्ध बांधव, उपासक व उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


बौद्ध धम्मामध्ये आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास उत्सव साजरा केला जातो. भगवान बुद्धांनी दिलेल्या वर्षावास परंपरेत सहभागी होऊन धम्म, शील, समाधी आणि प्रज्ञेची साधना करण्याचा हा पवित्र काळ मानला जातो.


वर्षावासाच्या माध्यमातून धम्माचे आचरण, आत्मचिंतन आणि सदाचाराला महत्त्व दिले जाते. त्रिशरण, पंचशील आणि धम्माच्या आचरणातून जीवन अधिक समृद्ध, संयमी, शांततामय आणि आनंदी करण्याचा संदेश या काळात दिला जातो. त्यामुळे सर्व बौद्ध उपासक-उपासिकांनी या धम्म प्रवचन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


कार्यक्रमाचे ठिकाण : नालंदा बुद्ध विहार, अशोक नगर/सचिन नगर, पणदरे

प्रारंभ : रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६

वेळ : दर रविवारी सायंकाळी ७ वाजता


या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, पणदरे, बौद्ध युवक संघटना व महिला मंडळ, पणदरे, भारतीय बौद्ध महासभा तसेच समता सैनिक दल, शाखा पणदरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या