फलटण [प्रतिनिधी] : दिनांक 11 ऑगस्ट 2026,
मंगळवार पेठ फलटण येथील रहिवासी व तलाठी संजय निवृत्ती अहिवळे तसेच देविदास निवृत्ती अहिवळे यांच्या मातोश्री कालकथित अंजना निवृत्ती अहिवळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व कष्टाच्या साहाय्याने आपल्या मुलांना उच्चशिक्षित करून त्यांच्यावर उत्तम संस्कार घडवणाऱ्या एक आदर्श मातोश्री म्हणून अंजनाबाई यांची ओळख होती. त्या माजी नगरसेवक श्री. सनी अहिवळे, श्री. सागर अहिवळे व श्री. शिवा अहिवळे यांच्या आजी, तर मागासवर्गीय दुर्बल घटक समिती सभापती तथा नगरसेविका सौ. सुपर्णा सनी अहिवळे यांच्या आजी-सासू होत्या. त्यांच्या निधनाने अहिवळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून राजकीय, सामाजिक व नागरी क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज, मंगळवार दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता मंगळवार पेठ येथून अंत्ययात्रा निघणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे, नातसुना व पतवंडे असा मोठा परिवार आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज