फलटण नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक मुकेश अहिवळे यांचा अखिल भारतीय सफाई मजूर युनियन फलटणच्या वतीने वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा!

फलटण (प्रतिनिधी):22 जून 2026,

फलटण नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक श्री. मुकेश अहिवळे यांचा वाढदिवस अखिल भारतीय सफाई मजूर युनियन फलटणच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. युनियनचे फलटण शहर अध्यक्ष तथा सातारा जिल्हा सफाई कर्मचारी सनियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य श्री. मनोज मारुडा यांच्या हस्ते मुकेश अहिवळे यांना कामगार युनियन व सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

स्वच्छता निरीक्षक मुकेश अहिवळे हे आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामकाजाचे वैशिष्ट्य म्हणजे, ते केवळ आदेश देणारे अधिकारी नसून, सफाई कामगारांच्या सुख-दुःखात आणि त्यांच्या हक्कांच्या लढ्यात नेहमीच सकारात्मक भूमिका घेणारे मार्गदर्शक आहेत. अखिल भारतीय सफाई मजूर युनियनच्या माध्यमातून शहरात ज्या पद्धतीने स्वच्छतेचे आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचे काम चालते, त्याबद्दल श्री. अहिवळे यांच्या मनात नेहमीच एक आदरयुक्त भावना राहिलेली आहे. युनियनच्या शिस्तीचे आणि ग्राउंड लेव्हलवरील त्यांच्या कामाचे कौतुक ते नेहमीच करत आले आहेत.

शहराच्या आरोग्य आणि स्वच्छतेची धुरा सांभाळणारे स्वच्छता निरीक्षक आणि ग्राउंडवर काम करणारे सफाई कर्मचारी यांच्यातील समन्वय अधिक दृढ व्हावा, याच भावनेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय सफाई मजूर युनियनच्या माध्यमातून शहरात फलटण नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सातत्याने विविध सामाजिक व स्वच्छतेची कार्ये सुरू असतात. यामध्ये स्वच्छता निरीक्षकांचे मिळणारे मार्गदर्शन व सहकार्य मोलाचे ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

समन्वय आणि विश्वासाचे प्रतीक: स्वच्छता निरीक्षक मुकेश अहिवळे आणि अखिल भारतीय सफाई मजूर युनियनचे नाते;

कोणत्याही शहराचे आरोग्य हे तिथल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कष्टावर आणि त्यांना योग्य दिशा देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कौशल्यावर अवलंबून असते. फलटण शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात फलटण नगर परिषदेचा आरोग्य विभाग आणि अखिल भारतीय सफाई मजूर युनियन यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. नुकताच आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक श्री. मुकेश अहिवळे यांचा वाढदिवस युनियनच्या वतीने ज्या उत्साहात साजरा करण्यात आला, तो केवळ एक वाढदिवसाचा सोहळा नव्हता, तर तो प्रशासन आणि कामगार यांच्यातील अभेद्य विश्वासाचा आणि आदराचा एक सुंदर सोहळा होता

या कार्यक्रमावेळी यांची प्रमुख उपस्थिती:

या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी प्रकाश मारुडा, चंदू मारुडा, निखिल वाळा, लखन डांगे, विनोद मारुडा, मिनल डांगे, शितल वाळा, नितीन वाळा, कल्पना वाळा, अज्जू मारुडा, सूरज मारुडा, रोहित मारुडा, विजयता अहिवळे यांच्यासह युनियनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, सफाई कर्मचारी व मोठ्या संख्येने महिला कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनीच स्वच्छता निरीक्षक अहिवळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या