आनंदाच्या अपघातबाबत सांत्वनपर भेटीस गेलेल्यांचाच अपघात


सातारा,दि.२२- : काशीळ,ता.सातारा येथील साहित्यिक प्रकाश काशीळकर यांचे बंधू आनंदा यांचे अपघाती निधन झाले होते.त्यांच्या सांत्वपर भेटीसाठी स्कुटीवरून जात असताना काशीळच्याच हद्दीत रस्त्यावरील खडीमुळे नेते चंद्रकांत खंडाईत व अनिल वीर यांचा अपघात झाला.

   जवळच असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णावर उपचार चालू असताना श्रीरंग वाघमारे, काशीळकर व त्यांचे मित्र मदतीसाठी धावुन आले. रिमझिम पावसात सातारकडे आगेकूच केली.खंडाईत आप्पा यांच्या पायाला जखम झाली असून मुक्का मार लागलेला आहे.गाडी आप्पा चालवत होते. ते गाडीवरून पडल्यानंतर त्यांच्यावरून वीरसर झेप घेऊन पडले. त्यांच्या उजव्या हाताच्या तळव्यास जखम झाली असून डाव्या खांद्यास मात्र जबरदस्त मुक्का मार लागला असून आतील हाडे वाकडी झाल्याचे दृश्य असह्य झाल्याने फार मोठा धक्काच बसला. साताऱ्यात एक्सरे काढल्यानंतर  सुस्थितीत असल्याचा दिलासा मिळाला. तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी खांदा पूर्ववत झाला. काही दिवस उपचारानंतर पूर्ववत जीवन जगतील. दरम्यान,अपघाताची बातमी गोपनीय ठेवूनही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विचारपूस सुरू झाली आहे.त्यामुळे मित्रपरिवार व नातेवाईक यांनी काळजी करू नये.असे नम्रआवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या