फलटण [प्रतिनिधी]: दिनांक 22 जून 2026,
फलटण नगर परिषद आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक (SI) अधिकारी श्री. मुकेश अहिवळे यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने वंचित बहुजन न्यूज, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
श्री. मुकेश अहिवळे हे नगर परिषदेमध्ये आरोग्य विभागाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने पार पाडत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांचे निराकरण करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. शहरातील स्वच्छता, आरोग्यविषयक सेवा आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण यासाठी ते दिवस-रात्र कार्यरत असतात.
विशेष म्हणजे, लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणालाही मदतीची गरज भासल्यास ते प्रत्यक्ष भेटीद्वारे किंवा दूरध्वनीवरूनही सहकार्य करतात. सामाजिक बांधिलकी जपत ते विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. तसेच फलटण तालुक्यातील आंबेडकरी चळवळींना व सामाजिक कार्यांना वेळोवेळी मदत करून त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या कर्तव्यनिष्ठ कार्याची दखल घेऊन भविष्यात त्यांना आरोग्य विभाग प्रमुख पदाची संधी मिळावी, अशी सर्व स्तरातून अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांनी यापुढेही शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी असेच उल्लेखनीय कार्य करत राहावे, तसेच त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भवितव्य लाभावे, हीच सदिच्छा.
श्री. मुकेश अहिवळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🎂
शुभेच्छुक :
वंचित बहुजन न्यूज, महाराष्ट्र राज्य💐

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज