विकास लवांडे हल्ला प्रकरणात पोलिसांवर दबावाचा आरोप
पुणे ,दि.१०-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते यांच्यावर झालेल्या हल्ला आणि शाईफेक प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोपी आणि त्याच्या साथीदारांविरोधात कठोर गुन्हे दाखल करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. मात्र, पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप असूनही पोलिसांनी आर्म ॲक्ट अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे.
“पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे?” असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाच्या तपासावर संशय व्यक्त करण्यात आला. भर दिवसा कायद्याला हरताळ फासत गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, विकास लवांडे यांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
या घटनेनंतर संत परंपरा आणि समाजसुधारकांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तथाकथित भोंदूबाबांवरही जोरदार टीका करण्यात आली. जगद्गुरु , , , आणि यांच्याविषयी चुकीची वक्तव्ये होत असताना काही कट्टरतावादी प्रवृत्ती गप्प बसतात, असा आरोप करण्यात आला.
“बंधुभाव, समता आणि शांततेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायात कट्टरतावादी गुंडांची घुसखोरी झाली आहे. संतांचा खरा विचार जपण्यासाठी आता अशा प्रवृत्तीविरोधात संघर्ष करण्याची वेळ आली आहे,” असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज