जामखेड,दि.१२-:प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस १० मे २०२६ रोजी जामखेड शहरात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील खर्डा चौक येथे आयोजित या सोहळ्यात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने परिसर गजबजून गेला होता.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ऍड.डॉ.अरुण जाधव आणि नगरसेविका संगीताताई भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जामखेड तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
यावेळी बोलताना ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, Prakash Ambedkar हे भारतीय राजकारणातील एक प्रगल्भ नेतृत्व असून ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. दलित, आदिवासी आणि समाजातील शोषित घटकांच्या हक्कासाठी लढणारे प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी नेहमीच मनुवादी विचारसरणीच्या विरोधात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित राजकारण केले आहे. सामाजिक न्याय आणि समतेसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला असून वंचितांच्या हक्कासाठी ते कायम आवाज उठवत असतात, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या सोहळ्याप्रसंगी भव्य केक कापून तसेच गोड लाडूंचे वाटप करून प्रकाश आंबेडकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमास नगरसेवक संतोष गव्हाळे, पवन राळेभात, आश्रू मामा शेवाळे, वसीम भाई सय्यद, आसिफ शेख, अशोक आव्हाड, सुरेखाताई सदाफुले, उमाताई जाधव, ॲड. हर्षल डोके, विकी भाऊ सदाफुले, बापू ओहोळ, अनिल सदाफुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच सुमित भालेराव, मोहन पवार, विशाल पवार, रजनी औटी, आश्रुबा गंगावणे, अरुण शिरसाट, सुधीर साठे, अंकल घायतडक, विकी कांबळे, अविनाश भोसले, पप्पू भालेराव, गौरव घायतडक, मच्छिंद्र जाधव, अरविंद जाधव, ऋषिकेश गायकवाड, साहिल जाधव, गणपत कराळे, अविनाश ओहोळ, मनोज घोडेस्वार, सुशील राजगुरू, अनिल साळवे, मनोज सांगळे, सचिन सदाफुले, सोहेल आतार, मनोज घायतडक, अमोल गव्हाळे, अभिषेक सांगळे आणि राजू जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरसेविका संगीताताई भालेराव यांनी केले.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज