पणदरेत संविधान उद्देशिकेचा फोटो लावण्यास टाळाटाळ; आंदोलनाचा इशारा



पणदरे (ता. बारामती) ,दि.४:– बौद्ध युवक संघटना पणदरे यांच्या वतीने दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय पणदरे येथे भारतीय संविधान उद्देशिकेचा फोटो फ्रेम भेट देण्यात आला होता. हा फोटो कार्यालयात लावण्याची मागणीही संघटनेने केली होती.


मात्र, आजतागायत ग्रामपंचायत प्रशासनाकडून संबंधित फोटो लावण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप बौद्ध युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.


याबाबत संताप व्यक्त करत, “लवकरात लवकर संविधान उद्देशिकेचा फोटो कार्यालयात लावण्यात यावा, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.


ही माहिती वंचित बहुजन न्यूजशी बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.


यावेळी संग्राम सोनवणे, प्रशांत सोनवणे, तुषार सोनवणे, अमित सोनवणे, सोनू सवाने, दत्तात्रय जावळे, अमित कांबळे, सचिन बगाडे यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या