बोगस डॉक्टर शोध मोहीम प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी संतोष पाटील

पोलिस व आरोग्य विभागाला संयुक्त कारवाईचे निर्देश • बोगस डॉक्टर आढळल्यास तात्काळ गुन्हा दाखल


अनिल वीर 

सातारा , दि. ४-:जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी पोलिस व आरोग्य विभागाने संयुक्तपणे प्रभावी शोध मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस डॉक्टर नियंत्रणासाठीच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

बोगस डॉक्टर आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. नागरिकांनी आपल्या परिसरात अशा डॉक्टरांविषयी माहिती मिळाल्यास ती तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावी, असे आवाहन करण्यात आले.

तसेच या मोहिमेत स्थानिक पोलिस पाटील यांना प्रशिक्षण देऊन सहभागी करून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

याशिवाय जिल्ह्यातील पॅथॉलॉजी लॅबची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी पोलिस व आरोग्य विभागाने समन्वयाने विशेष मोहीम राबवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

"बोगस डॉक्टर आढळल्यास तात्काळ गुन्हा दाखल करा"

जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस डॉक्टर नियंत्रणासाठी घेतलेली बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सांगितले 

नागरिकांना आवाहन 

  • बोगस डॉक्टरांची माहिती त्वरित पोलिसांना द्या
  • संशयास्पद क्लिनिकची माहिती लपवू नका
  • अधिकृत डॉक्टरांकडूनच उपचार घेण्यात यावे 
  • सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क रहावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या