महाराष्ट्र पुन्हा हादरले! नाशिकमध्ये अशोक खरातपेक्षाही मोठा घोटाळा उघड; टॅबमध्ये ८७ व्हिडिओ, १०० महिलांचे शोषण


नाशिक | प्रतिनिधी,दि.४-:नाशिकच्या सातपूर परिसरात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. खंडणीची तक्रार देणारा फिर्यादीच मुख्य आरोपी निघाल्याने या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे.


रवींद्र गणपत एरंडे (वय ६३) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून, तो स्वतःला पत्रकार आणि एनजीओ संचालक म्हणून ओळख करून देत होता. एरंडेने गरजू महिलांना, विशेषतः अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्सना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे.


पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांना नाशिक आणि इगतपुरी परिसरातील हॉटेल्समध्ये बोलावून अत्याचार करत असे. या सर्व प्रकाराचे गुपचूप चित्रीकरण करून तो व्हिडिओ आपल्या ताब्यात ठेवत होता.


पोलिसांनी जप्त केलेल्या टॅब आणि पेनड्राइव्हमधून तब्बल ८७ अश्लील व्हिडिओ सापडले असून, सुमारे १०० हून अधिक महिलांचे शोषण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यातील काही व्हिडिओ ‘ब्लू फिल्म’ स्वरूपात विक्रीसाठी वापरण्यात आल्याचीही शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.


या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सुरुवातीला एरंडेने स्वतःवर १२ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. मात्र, तपासादरम्यान एका पीडित महिलेने पुढे येत खरी बाब उघड केल्यानंतर पोलिसांनी एरंडेला अटक केली.


सध्या त्याच्यावर बलात्कार तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणातील इतर संबंधित आरोपी, व्हिडिओ विक्रीचे रॅकेट आणि संभाव्य पीडितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.


या घटनेमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, समाजातून संताप व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या