गडकरी आणि स्वरूपानंद महाराज अडचणीत? ठाण्यातून कायदेशीर कारवाईची ठिणगी



ठाणे (प्रतिनिधी) दि.३:– राज्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.


राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार व राज्य अध्यक्ष मा. युवराज दादा बनसोडे यांच्या सूचनेनुसार ठाणे जिल्हा रिपब्लिकन कामगार सेनेने थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे कारवाईची मागणी करत निवेदन सादर केले आहे. हे निवेदन मुंब्रा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आले.


या निवेदनामुळे राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात चर्चांना उधाण आले असून, पुढील काही दिवसांत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


निवेदन सादर करताना राज्य समन्वयक आयु. विक्रमभाई खरे, कोकण प्रदेश प्रमुख संघटक आयु. आकाशभाई गायकवाड, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष आयु. राजू दोंदे, उपाध्यक्ष आयु. राजदीप जगताप, उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष आयु. हनुमंत वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रिपब्लिकन कामगार सेनेने या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी करत इशारा दिला आहे की, न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या