आगर टाकळी येथील स्थानिकांच्या घरावर अतिक्रमण विभागाकडून होणारी कारवाई जुलमी - नगरसेवक राहुल दिवे.



नाशिक,दि.२४:- प्रभाग क्रमांक 16 संघर्ष समिती नाशिक यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 16 चे लोकप्रिय नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य राहुलभाऊ दिवे यांच्या नेतृत्वाखाली व आंबेडकरी चळवळीतील राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नाशिक मनपाचे शहर अभियंता श्री.संजय अग्रवाल यांची भेट घेऊन वरील विषयाचे निवेदन दिले.

निवेदनाचा विषय असा आहे की आगर टाकळी गावठाण मध्ये येणारे व सिटी सर्व्हे चे दाखले असलेले येथील काही घरे रस्ता रुंदीकरणात अडथळे होत असल्याचे कारण देऊन अतिक्रमण विभागाकडून घरे रिकामे करण्याच्या नोटीसा मनपा ने नागरिकांना दिल्या..

यामध्ये घरांवर बुलडोझर फिरणार असल्याने लोकांमध्ये प्रचंड भीती चे वातावरण निर्माण झाले असून याची दखल घेत नाशिक मनपाचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक राहुलभाऊ दिवे व भिमटोला सामाजिक संघटना चे सर्वेसर्वा महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी नाशिक मनपा मध्ये धाव घेत विकासकामाला विरोध नाही परंतु घरे तोडून विकास कसा साध्य होणार असा सवाल नगरसेवक राहुलभाऊ दिवे यांनी उपस्थित केला.

घरमालकांनी अतिक्रमण केलेले सर्व साहित्य काढून घेतले असून भविष्यात असे अतिक्रमण होणार नाही असे नागरिकांनी शहर अभियंता अग्रवाल साहेब यांना सांगितले खरंच ज्यांनी अतिक्रमण केले असेल ते काढण्यास आमची काहीही हरकत नाही असेही नागरिकांनी सांगितले.

यावेळी नाशिक मनपाचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक राहुलभाऊ दिवे, भिमटोला सामाजिक संघटनेचे सर्वेसर्वा तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, युवा नेते लखनभाऊ पगारे, युवा नेते बाबासाहेब पवार, योगीताताई साळवे, अजंलीताघ साळवे, मनिषाताई नटावटे, राईसाताई शेख,माधूरीताई नटावटे, उज्वलाताई जाधव, कविताताई शिंदे, मालतीताई साळवे, अंबादासभाऊ लोखंडे, सुनिलजी नेटावटे, राजेंद्रजी जाधव, रवीभाऊ शिंदे, देवेंद्रजी नेटावटे, पवनजी भालेराव, अजयजी दिवे, हुसेनजी शेख, मनिषजी डांगे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते  स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या