बारामती,दि.२४( प्रतिनिधी)- : माळेगाव येथील पोलीस ठाण्याने कार्यपद्धती, स्वच्छता आणि नागरिकाभिमुख सेवेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ‘स्मार्ट पोलीस ठाणे’ मानांकनासह ISO 9001:2015 प्रमाणपत्र पटकावले आहे. या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून माळेगाव पोलीस ठाण्याचे कौतुक होत आहे.
या मानांकनाचे वितरण संदीप सिंह गिल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यालयीन स्वच्छता, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, नियोजनबद्ध कामकाज आणि कार्यक्षम सेवा या विविध निकषांवर माळेगाव पोलीस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरी करत ही निवड मिळवली. लोकाभिमुख प्रशासन आणि उत्तम व्यवस्थापन यामुळे हे ठाणे बारामती तालुक्यातील आदर्श पोलीस ठाणे म्हणून ओळख निर्माण करत आहे.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे म्हणाले की, “माझ्या कार्यकाळात माळेगाव पोलीस ठाण्याला दोन पुरस्कार मिळाल्याचा अभिमान आहे. पुढील काळात हे ठाणे जिल्ह्यात क्रमांक एक बनवण्यासाठी आम्ही अधिक प्रयत्न करू.”
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेत समाधान व्यक्त केले आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज