नाशिक,दि.२५:- उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिकच्या वतीने रमाबाई आंबेडकर विद्यालय नाशिक येथे आयोजित सभा संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी वामनराव गायकवाड होते तर प्रमुख उपस्थिती समितीचे अध्यक्ष प्रकाश जी पगारे सर, मार्गदर्शक माजी न्यायमूर्ती अनिलजी वैद्य, मुख्य निमंत्रक महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे, मुख्य निमंत्रक डॉ.अविनाश शिंदे, मार्गदर्शक करुणासागर पगारे, मार्गदर्शक एकनाथ मोरे उपस्थित होते.
यावेळी अनुसूचित जातीचे वर्गीकरण विरोधात आंदोलन करण्याचे एकमताने ठरविण्यात आले..आंदोलनाची सुरुवात निदर्शने आणि उपोषणाने करण्यात येईल सर्वात आधी आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे
न्यायमूर्ती बदर कमिटीचा अहवाल तात्काळ रद्द करण्यात यावा महाराष्ट्र सरकारने उपवर्गीकरणाचा कोणताही प्रयत्न करू नये.. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीने कोणत्याही जातीने कोणत्याही जातीचे आरक्षण लाटलेले नाही महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवरगीकरणाची गरज नाही असे एकमताने ठरविण्यात आले.. महाराष्ट्रातून सर्व लोकप्रतिनिधींना अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या विरोधात निवेदन देण्याचे सुद्धा ठरविण्यात आले व तसे करण्यात आले..
30 एप्रिल पर्यंत जास्तीत जास्त हरकती घेण्यात याव्या असेही आवाहन करण्यात आले..
याप्रसंगी समितीचे प्रा. कुणालभाऊ वाघ, सनीभाई रोकडे, कैलासभाई तेलोरे, किशोरभाऊ गांगुर्डे, सुरेशजी नेटावटे, डॉ.प्रवीणजी गांगुर्डे, दिलीपजी दोंदे, मुकुंदराव काळे, प्रमोदजी पगारे, रविंद्रजी जाधव, गोविंदराव कटारे, विवेक तांबे, रवींद्रजी पगारे, राहुलजी जगताप, सुनिलजी साळवे, डॉ. अनिलजी आठवले, बाळासाहेब पेंढारकर, माधवराव गायकवाड, निलेशजी जगताप, एडवोकेट राजनजी शिंदे, पत्रकार सुरेशजी गांगुर्डे, अरुणजी दोंदे, सूर्यकांतजी शेजवळ, कांचनराज जाधव, प्रदीपजी बागुल, निलेश पाटोळे, जयवंतजी खडताळे, पंडितजी नेटावटे, एडवोकेट विलास जाधव, राजकुमार सावंत, प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज