नाशिक हादरवणाऱ्या अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट — ऐशोआरामात जगणाऱ्या पत्नीचे माहेर अजूनही गरिबीत!




नाशिक ,दि.१-: नाशिक जिल्ह्यात सध्या गाजत असलेल्या कथित अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असून, आता या प्रकरणाची एक अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक बाजू समोर आली आहे. ऐशोआरामात जीवन जगणाऱ्या कल्पना खरात (पूर्वाश्रमीची सुनीता) हिच्या माहेरची परिस्थिती मात्र आजही अत्यंत हलाखीची असल्याचे उघड झाले आहे.

 पोलिसांचा सर्च ऑपरेशन सुरूच!

फसवणूक प्रकरणात आरोपी असलेल्या कल्पना खरात हिचा पोलीस कसून शोध घेत आहेत. अटकेच्या भीतीने ती फरार झाली असून, नाशिकमधील कर्मयोगीनगर येथील ‘तृप्तबाला’ बंगल्यावर एसआयटीने धाड टाकली होती. मात्र पोलिसांची चाहूल लागताच ती पसार झाली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी तिचा मुलगा हर्षवर्धन आणि मुलगी तृप्ताबाला यांना ताब्यात घेतले आहे.

फरार कल्पना खरातच्या शोधासाठी विशेष पथक पुण्याकडे रवाना झाले आहे.

 माहेर अजूनही गरिबीत; दु:खांची मालिका

कल्पना खरातचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील पाडळी असून, तिच्या माहेरची परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचे समोर आले आहे.

मोठ्या भावाचा अपघातात मृत्यू


त्यानंतर वडिलांचे आजाराने निधन


घरात सध्या फक्त वृद्ध आई, विधवा वहिनी आणि लहान भाचा



एकीकडे कोट्यवधींच्या व्यवहारात नाव, तर दुसरीकडे माहेरची उपासमार—ही तफावत समाजमन हेलावून टाकणारी ठरत आहे.


 पैशासाठी झाले लग्न?

अशोक खरात याचे वय जास्त असल्यामुळे त्याचे लग्न जमत नव्हते. अशावेळी नातेवाईकांच्या मध्यस्थीने कल्पना हिच्याशी विवाह ठरवण्यात आला.

दोघांच्या वयात मोठा फरक

लग्नाचा सर्व खर्च खरात कुटुंबाकडून

गरिबीमुळे वडिलांनी दिली संमती


या पार्श्वभूमीवर हे लग्न ‘सामाजिक गरज’ की ‘आर्थिक व्यवहार’? असा सवाल उपस्थित होत आहे.

माहेरशी संपर्क तोडला?


लग्नानंतर कल्पना खरातच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला.


ऐशोआरामात जीवन


माहेरच्या लोकांशी संपर्क जवळपास बंद


गावात क्वचितच भेट

दरम्यान, तिचा एक भाऊ सिन्नर-शिर्डी महामार्गावरील ‘शिव संकल्प हार्डवेअर’ दुकान चालवत असल्याची माहिती आहे, तर दुसरा भाऊ नाशिकमध्ये वास्तव्यास आहे.


तपासाची दिशा बदलणार?


या सर्व घडामोडींमुळे अशोक खरात प्रकरण केवळ आर्थिक गुन्ह्यांपुरते मर्यादित नसून, सामाजिक, कौटुंबिक आणि नैतिक प्रश्नही पुढे आणत आहे.

 पोलिस तपासातून आणखी कोणते धक्कादायक सत्य समोर येणार?

फरार कल्पना खरात कधी सापडणार?

संपूर्ण राज्याचे लक्ष आता या प्रकरणाकडे लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या