मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि प्रशासनाला अंतिम इशारा; दोषींवर निलंबन व बोगस फायर NOC रद्द करण्याची मागणी
बारामती | प्रतिनिधी,दि.६-:बारामती शहरातील बेकायदेशीर खासगी कोचिंग क्लासेस, बोगस फायर NOC आणि कथित भ्रष्टाचाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते मोहिसीन अ. पठाण यांनी राज्य सरकार व संबंधित प्रशासनाला अंतिम इशारा देत ५ ऑगस्ट २०२६ पासून बारामती नगरपरिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र बोर्ड आणि नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात बारामती शहरात शिक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात नियमबाह्य प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार आवश्यक परवानग्यांशिवाय खासगी कोचिंग क्लासेस व अकॅडमी चालविण्यास परवानगी नसतानाही अनेक संस्था सुरू आहेत. तसेच, फायर NOC नसतानाही किंवा कथित बोगस फायर NOC च्या आधारे या संस्था सुरू असल्याचा आरोप करण्यात
आला आहे.
याशिवाय काही शाळांमध्ये या अकॅडमीतील विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश (Integrated Admission) दाखवून शिक्षण विभागाची दिशाभूल होत असल्याचाही गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
मोहिसीन पठाण यांनी यापूर्वी फेब्रुवारी २०२३ पासून विविध शासकीय कार्यालयांकडे तक्रारी, अर्ज आणि पाठपुरावा केल्याचे नमूद केले आहे. मात्र, अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्य मागण्या
बारामती नगरपरिषदेकडून देण्यात आलेल्या कथित बोगस व नियमबाह्य फायर NOC तात्काळ रद्द कराव्यात.
सर्व बेकायदेशीर खासगी कोचिंग क्लासेस व अकॅडमींना सील करण्यात यावे.
बोगस प्रवेश दाखविणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी.
संबंधित अग्निशमन अधिकारी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
निवेदनात मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे५ ऑगस्ट २०२६ पासून बारामती नगरपरिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले, असल्याचे वंचित बहुजन न्यूज शी बोलताना स्पष्ट करण्यात आले.या वेळी सचिन गायकवाड बहुजन हक्क परिषद व संजय वाघमारे तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी पाठिंबा दिला असून इतरही संघटना पाठिंबा देत आहेत यावेळी इतर बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज