फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

 



फलटण,दि.२३-: तालुक्यातील १८ ते ३५ वयोगटातील महिला, मुली व युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने Centre for Youth Development and Activities (CYDA), Pune , Yashwantro chavan shool of social work, Satara.

  नवयान संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण संस्था, बरड यांच्या माध्यमातून मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.


या उपक्रमांतर्गत इच्छुक महिला व युवकांना त्यांच्या आवडीच्या विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांपैकी कोणत्याही एका अभ्यासक्रमाचे पूर्णपणे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. विशेष म्हणजे, प्रशिक्षण शक्यतो सहभागींच्या परिसरातच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर सहभागी उमेदवारांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न व सहकार्य केले जाणार आहे. त्यामुळे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना शक्यतो त्यांच्या परिसरात रोजगार मिळविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल आणि रोजगार दिला जाईल. 


तसेच, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रत्येक पात्र सहभागीला संबंधित अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र (Certificate) देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्रामुळे उमेदवारांना पुढील रोजगाराच्या संधी मिळविण्यास मदत होईल.


त्याचबरोबर इच्छुक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही दिले जाणार आहे.


या उपक्रमाची वैशिष्ट्ये :


* प्रशिक्षण पूर्णपणे मोफत

* प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क नाही

* आपल्या परिसरात प्रशिक्षणाची सुविधा

* प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कोर्सचे प्रमाणपत्र

* प्रशिक्षणानंतर स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी

* सातारा जिल्ह्यातच रोजगार मिळविण्यासाठी सहकार्य

* चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्यासाठी मार्गदर्शन

* स्वाभिमानाने काम करण्याची संधी

* स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक महिलांना मार्गदर्शन


आजच्या काळात कौशल्य विकासाला मोठे महत्त्व असून, महिला व युवकांनी उपलब्ध संधींचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


१८ ते ३५ वयोगटातील इच्छुक महिला, मुली व युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आजच नोंदणी करावी, मोफत प्रशिक्षण व प्रमाणपत्र मिळवावे आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधींसाठी स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहन अध्यक्ष नवयान संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण संस्था, बरड. यांच्या वतीने करण्यात आले आहे.


संपर्क :- हनुमंत भानुदास लोंढे.

नवयान संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण संस्था, बरड.

मो नं :- 9112349797

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या