"कोल्ड्रिंकच्या बहाण्याने अत्याचाराचा आरोप; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार लैंगिक शोषण? आरोपी अटकेत!"

माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पीडितेच्या तक्रारीनंतर बारामती तालुक्यातील आरोपीला अटक, पोलीस तपास सुरू


माळेगाव | प्रतिनिधी

दि.७-:माळेगाव पोलीस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून बारामती तालुक्यातील ढाकाळे येथील अभिषेक मुकुंदराव जगताप याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(2)(m), 351(1) व 351(2) अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास तसेच त्यापूर्वीच्या सुमारे 15 दिवसांच्या कालावधीत ती माहेरी यात्रेसाठी गेली असताना, तिच्या भावकीतील आरोपीने कोल्ड्रिंक पिण्याच्या बहाण्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.


तक्रारीनुसार, संबंधित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेच्या सासरी जाऊनही वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.


या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 196/2026 नुसार नोंदविण्यात आला असून गुन्ह्याची नोंद क्रमांक 47/2026 अंतर्गत रात्री 9.33 वाजता करण्यात आली. या प्रकरणाचे दाखल अधिकारी पोलीस नाईक सानप (बकल नं. 758) असून तपास पोलीस उपनिरीक्षक ओमासे करीत आहेत.


पोलीसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, न्यायालयीन प्रक्रियेनंतरच आरोपीच्या दोषाबाबत अंतिम निर्णय होणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या