फलटण: [प्रतिनिधी] दिनांक 1 ऑगस्ट 2026,
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२६, फलटण यांच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अत्यंत उत्साहात व आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत 'भीम जयंती समिती, फलटण' यांच्या सौजन्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा आणि समाजप्रबोधनपर सुविचार असलेला एक आकर्षक शुभेच्छा बॅनर उभारण्यात आला.
"जगातील सर्व शोषित आणि कष्टकरी जनतेचे दुःख आपल्या लेखणीतून मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे समाजाला एकत्र बांधणारे व संघर्षाची प्रेरणा देणारे आहेत. 'जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भीमराव' या अण्णाभाऊंच्या ओळींप्रमाणेच समाजात बंधुभाव, समानता आणि विचारांची देवाणघेवाण अधिक दृढ व्हावी, याच प्रबोधनाच्या हेतूने या बॅनरची स्थापना करण्यात आली आहे," असे मत या वेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
या अभिवादन कार्यक्रमास परिसरातील प्रमुख कार्यकर्ते व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये भीम जयंती समितीचे अध्यक्ष हरिश (आप्पा) काकडे यांच्यासह आदर्श अहिवळे, शशीकांत अहिवळे, सूजल गायकवाड, अनिकेत अहिवळे, विराज घोडके, संघर्ष अहिवळे, प्रेम अहिवळे, स्वप्निल काकडे, संघराज अहिवळे, अमर अहिवळे, संघकारा अहिवळे, साहिल अहिवळे, संविधान काकडे आणि देवराज अहिवळे आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.
समितीच्या या सामाजिक आणि प्रबोधनपर उपक्रमाचे फलटण शहरातील नागरिकांकडून व विविध स्तरांतून विशेष कौतुक केले जात आहे.



0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज