पणदरे | प्रतिनिधी
दि.२९-: पुणे जिल्ह्यातील पणदरे येथे आज पहाटे ४:१५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर धाडसी हल्ला करत एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी एटीएमचे मोठे नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, एटीएम आणि बँकांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज