भर जिल्हा परिषद सभेत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; पुण्यात खळबळ

बारामतीतील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून फसवणुकीचा आरोप; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला




पुणे | प्रतिनिधी

दि.२८-: पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. बारामती येथील पणदरे गटातील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत एका तरुणीने भरसभेत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सभागृहात तैनात असलेल्या पोलिसांनी आणि सुरक्षारक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.



मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना संबंधित तरुणी अचानक सभागृहात दाखल झाली. काही क्षणांतच तिने सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतले. हा प्रकार घडताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. उपस्थित पोलिसांनी प्रसंगावधान राखत तिला ताब्यात घेतले आणि पुढील अनुचित घटना होण्यापासून रोखले.


पीडित तरुणीने बारामतीतील पणदरे गटातील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर अनेक वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. न्यायासाठी वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळाली नसल्याने आणि प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे उद्विग्न होऊन हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा तिने केला.



घटनेनंतर काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून, तिने केलेल्या आरोपांची पोलिसांकडून सखोल पडताळणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे

- भर जिल्हा परिषद सभेत आत्महत्येचा प्रयत्न.

- अंगावर पेट्रोल ओतताच सभागृहात खळबळ.

- पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

- जिल्हा परिषद सदस्यावर लग्नाचे आमिष दाखवून फसवणुकीचा आरोप.

- प्रकरणाचा पुढील तपास सुरू.करण्यात आला असल्याचे सांगितले 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या