अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

अकोला, प्रतिनिधी ,दि.२- : वंचित बहुजन आघाडीच्या अकोला शहरातील टॉवर चौक येथील पक्ष कार्यालयात हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला तसेच त्यांच्या कृषी, ग्रामीण विकास आणि लोककल्याणकारी धोरणांचा स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष हाजी मजहर खान यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.


यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, तालुकाध्यक्ष किशोर जामानिक, महानगराध्यक्ष हाजी मजहर खान, महानगर महासचिव गजानन (दादा) गवई, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, डॉ. मेश्राम, प्रदीप शिरसाट, आनंद डोंगरे, वसंतराव नागे, गजानन दांडगे, दीपक सावंग, दिलीप शिरसाट, शंकरराव इंगोले, सतीश चोपडे, पंकज दामोदर, संजय बुध, सुयोग आठवले, तानाजी मोरे, संदेश मोरे, संतोष गवई, शुद्धोधन इंगळे, एकनाथ शिरसाट, दामोदर जगताप, साबीर भाई, प्रा. सोनवणे, प्रा. सुजित वाहूरवाघ, अशोक लोणाग्रे, जनार्दन गवई, जनार्दन तायडे, शुद्धोधन ढवळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी उपस्थितांनी वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषी विकासासाठी, शेतकरी हितासाठी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या