श्री.अजय सूळ यांची 'युवासेना फलटण तालुकाप्रमुख' पदी निवड करा; तालुक्यातील कार्यकर्त्यांची जोरदार मागणी!!

 

फलटण (प्रतिनिधी): दिनांक 10 जून 2026,

ग्रामीण भागातून आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर संपूर्ण तालुक्यात लोकप्रिय झालेले, डोंबाळवाडी (काळज) येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि मा. विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर(महाराज साहेब) यांचे अत्यंत जवळचे, विश्वासू व निष्ठावंत राजे गटाचे कट्टर निष्ठावंत समर्थक अजय सूळ यांची 'युवासेना (शिवसेना - श्री एकनाथ शिंदे गट) फलटण तालुकाप्रमुख' पदी निवड करण्यात यावी, अशी जोरदार मागणी फलटण तालुक्यातील युवा वर्ग आणि शिवसेना कार्यकर्त्यांमधून होत आहे. त्यांच्या या संभाव्य निवडीमुळे तालुक्यात शिवसेनेला मोठी ताकद मिळणार असल्याचा सूर उमटत आहे.

डोंबाळवाडी ते फलटण तालुका: कामातून निर्माण केली ओळख;

अजय सूळ यांनी डोंबाळवाडी सारख्या एका छोट्याशा गावातून आपल्या सामाजिक प्रवासाला सुरुवात केली. आज त्यांनी आपल्या लोकसंग्रहाच्या आणि कामाच्या जोरावर फलटण तालुक्यात स्वतःची एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तालुक्यात कुठेही सामाजिक किंवा शैक्षणिक उपक्रम असो, अजय सूळ तिथे नेहमीच अग्रेसर असतात. केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे फलटण तालुक्यातील गावोगावी युवा वर्गाशी त्यांचा दांडगा संपर्क तयार झाला आहे.

अडचणीतील कार्यकर्त्यांचा 'हक्काचा आधार'!

अजय सूळ यांची फलटण तालुक्यात खरी ओळख निर्माण झाली ती त्यांच्या 'मदतीला धावून जाण्याच्या' प्रामाणिक गुणामुळे. कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा किंवा गावातील सामान्य कार्यकर्ता अडचणीत असला, की त्याला सर्वप्रथम मदत करणारा माणूस म्हणजे अजय सूळ, असे समीकरण आता बनले आहे. त्यांच्या याच निर्मळ स्वभावामुळे तालुक्यातील हजारो तरुण त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले आहेत. 

राजे गटाची एकनिष्ठ व शिवसेना विचारांचे समर्थक:

म्हणून अलीकडच्या काळात ओळखले जातात. त्यातच आता शिवसेना (श्री एकनाथ शिंदे गट) पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या या दांडग्या जनसंपर्काचा आणि चांगुलपणाचा फायदा येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांमध्ये पक्षाला नक्कीच मोठ्या प्रमाणावर होईल, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

कार्यकर्त्यांची एकच मागणी: 'युवासेना तालुकाप्रमुख पद' मिळावे!

अजय सूळ यांच्या याच निस्पृह सेवेची आणि नेतृत्वाची दखल घेऊन शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना 'युवासेना फलटण तालुकाप्रमुख' म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी तालुक्यातील युवक आग्रहाने करत आहेत. अजय सूळ यांच्यासारख्या सुशिक्षित, अभ्यासू आणि नेहमी उपलब्ध असणाऱ्या युवा नेत्याला जर ही जबाबदारी मिळाली, तर फलटण तालुक्यात युवासेनेचे जाळे अधिक मजबूत होईल आणि हजारो तरुण पक्षाशी अधिक सक्रियतेने जोडले जातील, अशी खात्री कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. आता शिवसेना आणि युवासेनेचे वरिष्ठ नेते या जनभावनेची दखल कधी घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या