समाज कल्याण विभागाच्या विविध योजना वंचितांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावी




पुणे, दि. २२ : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार समाज कल्याण विभागाच्या विविध योजना तसेच सामाजिक प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.


बैठकीत अनुसूचित जाती, नवबौद्ध घटक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर वंचित घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला. शासनाच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी विभागीय समन्वय वाढविणे, अर्ज प्रक्रिया सुलभ करणे आणि प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.



सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी सांगितले की, समाजातील वंचित घटकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळणे ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने संवेदनशीलतेने काम करून लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी.


बैठकीस विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या