सातारा,दि.७- : आरक्षण बचाव समितीच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयामोर धरणे आंदोलन करण्यात आले.परिसर घोषणांनी दणाणून गेला होता.सरतेशेवटी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
एससी आरक्षणाचा १०० टक्के कोटा पुर्ण करा.शासकीय भरतीचे कंत्राटीकरण बंद करा.
खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करा. एससी प्रवर्गाच्या विकासाचा निधी बजेट खर्चाचा इतरत्र न वळवता तो पुर्ण खर्च करण्याचा कायदा करा. जातीनिहाय जनगणना करा. एससी प्रवर्गात ५९ जाती येतात. त्यातील किती जातसमूहांनी उपवर्गीकरनाची मागणी केली ? हे शासनाने जाहीर करावे. शासनाने गठीत केलेल्या समितीचा अहवाल सार्वजनिक करावा.अशा मागण्यांसाठी व न्यायालयाने कोणताही सक्तीचा आदेश नसताना एससी आरक्षणाचे वर्गीकरण अन्यायकारक व एकतर्फी होत असल्याने या उपवर्गीकरनास आमचा तीव्र स्वरूपाचा विरोध आहे.अशा आशयावरचे निवेदन होते. त्याबाबतही अनेकांनी मार्गदर्शन केले.सदरच्या आंदोलनात सर्वश्री चंद्रकांत खंडाईत,गणेश कारंडे, प्रा.राजेंद्र भिंगारदेवे, दादासाहेब केंगार, अदिनाथ बिराजे, सुनिल त्रींबके,निलेश लाड,प्रल्हाद घोडके,आबासाहेब दणाने,नंदकुमार काळे,सुभाष सोनावणे,बी एल.माने,सतीश माने,चित्राताई गायकवाड, सुभाष गायकवाड,योगेश कांबळे,मिलिंद कांबळे, दादासाहेब कांबळे,रामदास वाघमारे,बाळासाहेब सावंत, अमोल गंगावणे,माणिक आढाव,रमेश गायकवाड,विशाल भोसले,नीती रोकडे,नितीन चव्हाण,वसंत गंगावणे,अशोक भालेराव, हिंदुराव बोडके, मिलिंद सावंत,अशोक भोसले, संजय मुळीक,तुकाराम कांबळे, प्रज्ञाशील कांबळे,डी. एस. भोसले,साळुंखे,अशोक कांबळे,अर्जुनराव भालेराव, शिवनाथ जावळे, मुरलीधर खरात,महादेव मोरे,वसंत खरात,श्रीरंग वाघमारे,चंद्रकांत म्हस्के, वसंत गंगावणे,संगीता डावरे,मंगेश डावरे, अनिल वीर व सर्व समविचारी फुले - शाहु - आंबेडकरी विचारांच्या पक्ष संघटना व संस्था यांचे प्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज