अनिल वीर
सातारा,दि.१६- : मानवामध्ये धम्म असणे गरजेचे आहे.अन्यथा, शांतता नांदू शकत नाही.असे प्रतिपादन वक्ते सुदर्शन इंगळे यांनी केले.
येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांच्या गृहप्रवेश प्रसंगी इंगळे मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले,"पूर्वी घरे चांगल्या प्रकारची नसत.मात्र,आपण बाबासाहेबांच्या विचाराने प्रगती केली असल्याने वैभवसंपन्न वास्तु निर्माण करीत आहोत.बापू परिवाराचा सामाजिक सहभाग आहे.त्याचे प्रतिबिंब नव्याने निर्माण केलेल्या घरात प्रतिबिंब आढळुन येत आहे.निर्जीव असणाऱ्या घरात माणसांमुळे सजीवता निर्माण होत असते. तेव्हा कुटुंबानेच धम्माचारण करणे गरजेचे आहे.माणसाने निर्व्यसनी व सदाचारपणे राहिले पाहिजे." प्रगती ही धम्मामुळेच होत असते.असाही पुनरुच्चार त्यांनी केला.
थेरो दिम्पकर (भन्ते) म्हणाले,"आपण बौद्ध आहोत हे प्रत्येक मानवाने कृतीयुक्त आचरणाने दाखवून दिले पाहिजे." मंगेश डावरे म्हणाले, "बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेऊन धम्माची तत्व अंगिकारली. तेव्हा त्यांनी दिलेल्या वाटेवर चालणे गरजेचे आहे." यावेळी धम्मशील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विलास कांबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत आदींनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.पी.टी. कांबळे (बापू) यांनी उपस्थितांचे आभार मानताना ऍडव्होकेट असणाऱ्या मुलामुळे नवीन घर बांधल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.दुसरा मुलगा पोलीस अधिकारी आहे.
प्रथमतः फीत कापुन कांबळे कुटुंबीयांनी प्रवेश केला.थेरो दिम्पकर यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण विधी पार पाडण्यात आला. सदरच्या कार्यक्रमास सम्यक ज्येष्ठ नागरिक संघाचे शामराव बनसोडे,प्रशांत झालटे, गणेश कारंडे,रामदास वाघमारे, तुकाराम गायकवाड, अंकुश धाइंजे, माणिक आढाव, संजय नितनवरे,अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज