राज्यभर “गाव अंधश्रद्धामुक्त समिती” स्थापन करण्याचा उपक्रम

सजीव संरक्षण आणि जागृती संस्थेची सामाजिक जनजागृती मोहीम


बारामती, प्रतिनिधी ,दि.१७-:

यांच्या वतीने राज्यभर “गाव अंधश्रद्धामुक्त समिती” स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. समाजामध्ये वाढत चाललेली अंधश्रद्धा, जादूटोणा, भोंदूगिरी, अफवा, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक तसेच अज्ञानामुळे होणारे सामाजिक नुकसान रोखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

या समितीच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती कार्यक्रम, प्रबोधन सभा, शालेय मार्गदर्शन, व्यसनमुक्ती अभियान तसेच आरोग्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. श्रद्धेचा आदर राखून अंधश्रद्धेला विरोध करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून समाजात शांतता, बंधुता आणि संविधानिक मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या अभियानामध्ये गावातील युवक, महिला, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य कर्मचारी, देवरुष, भजन-कीर्तन मंडळ तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. प्रत्येक गावात स्थानिक पातळीवर समिती स्थापन करून सामाजिक सलोखा आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी कार्य करण्यात येणार आहे.

संस्थेच्या वतीने राज्यातील नागरिकांना या सामाजिक अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य कार्यालय : सुपे, ता. बारामती, जि. पुणे
संपर्क : 9146618585

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या