वाशीम, (प्रतिनिधी) दि.२५- : सोशल मीडियाच्या माध्यमातून कला, संस्कृती आणि सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील दोन रील स्टार युवतींची राज्यस्तरीय “कर्तव्यदक्ष पुरस्कार २०२६” साठी निवड करण्यात आली आहे. “संकल्प बहुउद्देशीय संस्था” यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात वाशीमची पियू आणि परभणीची निशा मग्रे यांना गौरविण्यात येणार आहे.
शेगाव येथे जून २०२६ मध्ये होणाऱ्या या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक, कला, शिक्षण, युवक व महिला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा या कार्यक्रमात गौरव होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
“कार्य तुमचे कर्तव्य आमचे” या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचे मुख्य आयोजन प्रतीक्षा वासनिक यांनी केले असून, कार्यक्रमासाठी राज्यभरातून नामांकन मागविण्यात आले आहेत.
सोशल मीडियावर आपल्या रील्सच्या माध्यमातून मोठी लोकप्रियता मिळवलेल्या या युवतींच्या निवडीमुळे वाशीम व परभणी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कला आणि डिजिटल माध्यमातील त्यांच्या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय सन्मान जाहीर झाल्याने चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज