पुणे (प्रतिनिधी),दि.१: – ऊरूळी कांचन येथील डॉ मनीभाई देसाई प्रतिष्ठान यांच्या वतीने सोमवार, 27 एप्रिल 2026 रोजी डॉ. मनीभाई देसाई यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
संगीत व कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल संगीतकार शिवराज साने सर यांना “पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या 20 वर्षांपासून ऊरूळी कांचन व परिसरात साने संगीत क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी नाममात्र दरात विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी त्यांनी सातत्याने परिश्रम घेतले असून विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले आहेत. तसेच त्यांच्या विद्यार्थ्यांनी आकाशवाणी केंद्रावरही कार्यक्रम सादर केले आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाला खादी ग्रामोद्योग मंत्री ना. रविंद्र साठे, पी.एस.आय. व राष्ट्रपती पदक विजेत्या जयश्री पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाचे आयोजन ह.भ.प. डॉ. रविंद्र भोळे (हिंदू रत्न पुरस्कार विजेते) यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. साळवे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नार्मन नार्टन सर यांनी केले.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज