बारामती,दि.१-: तालुक्यातील सोनकसवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कल्याणी राजेंद्र कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
यापूर्वी उपसरपंच पद भूषवणारे सतीश घुले यांनी ठरलेल्या कालावधीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच राणी सतीश कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
उपसरपंच पदासाठी कल्याणी कोकरे आणि दादा शेलार यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, छाननी प्रक्रियेत कल्याणी कोकरे यांचा अर्ज वैध ठरल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य कोमल गायकवाड, नितीन लोखंडे, चित्रा सुळ, अक्काताई कोकरे, सतीश घुले, गणेश कोकरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच पोपटराव घुले, राहुल कोकरे, सी.बी. गायकवाड, रोहन गायकवाड, गंगाराम कोकरे, अंकुश लोखंडे, दिलीप कोकरे, आप्पा सुळ, सोपान महानवर, अमोल महानवर, हनुमंत कोकरे, गणेश सणस, गणेश लोखंडे, गणेश बनकर आदी मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली.
ग्रामपंचायतीच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज