फलटण:[प्रतिनिधी] दि.1मे 2026
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या फलटण नगरपरिषद (जि. सातारा) शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी श्री. मुकेश विनायक अहिवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल पवार यांनी या नवीन कार्यकारिणीला अधिकृत मंजुरी दिली आहे.
राज्य संघटनेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, फलटण नगरपरिषदेमधील कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी ही नवीन शाखा सदैव कार्यरत राहील. या निवडीबद्दल राज्य संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.
फलटण शाखा - मुख्य पदाधिकारी:
मुकेश अहिवळे यांच्यासोबतच इतर महत्त्वाच्या पदांवर खालीलप्रमाणे निवडी करण्यात आल्या आहेत:
अध्यक्ष: मुकेश विनायक अहिवळे
उपाध्यक्ष: प्रकाश लक्ष्मण राठोड, विजयता सुनील अहिवळे, मंगेश मधुकर माने, नितीन देविदास वाळा, शिवेंद्रराज श्रीकांत कांबळे
कार्याध्यक्ष: शिवभोला भालेराव काकडे, सचिन रामचंद्र घोलप
सचिव: रमेश चुन्नीलाल वाघेला, अमोल सुरेश सरतापे, भारत प्रकाश काकडे
सहसचिव: किरण राजू अहिवळे, अविनाश अंकुश इंगळे, राहुल जगदीश डांगे
कोषाध्यक्ष: संतोष हरिबा काकडे, आश्वया साहेबराव काकडे, अमोल दादा आवळे
प्रसिद्धी प्रमुख: हरी शरणाप्पा बनसोडे
कायदेशीर सल्लागार: ॲड.वर्धमान विनायक अहिवळे, ॲड. मनोज बाळासाहेब जावळे, ॲड. शितल दादा अहिवळे
याशिवाय कार्यकारिणीमध्ये मोठ्या संख्येने महिला प्रतिनिधी आणि सदस्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि संघटनेच्या मजबुतीसाठी ही नवीन टीम जोमाने काम करेल, असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष मुकेश अहिवळे यांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल फलटण नगरपरिषद प्रशासन आणि कर्मचारी वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज