सोनकसवाडी (प्रतिनिधी),दि.२७-:
सोनकसवाडी येथे दररोज सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणाऱ्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, तातडीने ही वीज कपात बंद करण्यात यावी, अशी ठाम मागणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परीक्षांचा कालावधी सुरू असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी रात्रीची वेळ अत्यंत महत्त्वाची असते. मात्र याच वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच दैनंदिन कामकाज, लहान मुलांचे आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत असल्याचेही नागरिकांनी नमूद केले.
या संदर्भात ग्रामपंचायतीमार्फत संबंधित वीज वितरण कार्यालयाकडे निवेदन देण्यात आले असून, “लोडशेडिंगची वेळ तातडीने बदलावी किंवा पूर्णतः बंद करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा संतप्त नागरिक रस्त्यावर उतरतील.
या मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सतीश कोकरे ,राजेंद्र कोकरे, रोहन गायकवाड, बाळासो घुले, गणेश कोकरे, अभिजीत गायकवाड, संदीप कोकरे, विजय कोकरे ,गजानन कोकरे, धनाजी मोहिते, गणेश सनस, अमोल महानवर,तुषार सूळ, वंचित बहुजन न्यूज चे संपादक महेश गायकवाड व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज