परंडा : (दि. ११/०४/२०२४) — महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९व्या जयंतीनिमित्त परंडा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेसमोर धूप-दीप प्रज्वलित करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष मोहनदादा बनसोडे, शिवसेना (उबाठा) युवा नेते विश्वजित पाटील, परंडा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष समरसिंह ठाकूर, फुले-आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, गटनेते अनिल शिंदे, नगरसेवक रमेशसिंह परदेशी, राहुल बनसोडे, मजहर दहलुन, डॉ. अब्बास मुजावर, सत्तार पठाण, अकीब पठाण, अविनाश विधाते, सोमनाथ अलबते, माजी नगराध्यक्ष नसीर शहाबर्फीवाले, शिवाजी मेहेर, युवा नेते श्रीहरी नाईकवाडी, नंदकुमार शिंदे, उमाकांत गोरे, तानाजी सोनवणे, शांतीलाल चंदनशिवे, अजीनाथ राऊत, उत्तरेश्वर बापू ठवरे, प्रा. विलास गायकवाड, शहराध्यक्ष किरणदादा बनसोडे, तु.दा. गंगावणे, पत्रकार विजय मेहेर, गोरख देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विलास जाधव, उपाध्यक्ष नवनाथ गावडे, शहाजी सोलंकर, गंप्पू साडेकर, तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे, घनशाम शिंदे यांचीही उपस्थिती होती.
यावेळी विविध सामाजिक संघटनांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज