मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर – छत्रपती शिवाजी महाराज संयुक्त जयंती उत्साहात साजरी; सुजात आंबेडकरांची प्रभावी उपस्थिती




मुंबई,दि.२७- : सामाजिक समता, न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांना उजाळा देत मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वंचित बहुजन आघाडी प्रणित रिपब्लिकन युनियन ऑफ इन्शुरन्स एम्प्लॉईज यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि परिवर्तनाच्या लढ्याची गरज अधोरेखित केली.


या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, मुंबई युवा अध्यक्ष सागर गवई तसेच रिपब्लिकन युनियन ऑफ इन्शुरन्स एम्प्लॉईजचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमात विचारप्रवर्तक भाषणे, सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारे संदेश आणि एकात्मतेचा संदेश देणारे विविध उपक्रम पार पडले. उपस्थितांनी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांना अनुसरून समाज परिवर्तनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या