फलटण पोलिसांची धडाकेबाज कारवाई: तडीपार गुन्हेगाराला गजानन चौकातून ठोकल्या बेड्या!


फलटण: [प्रतिनिधी]

सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला एक सराईत गुन्हेगार फलटण शहरात फिरत असताना फलटण शहर पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे. या कारवाईमुळे शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक निर्माण झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यातील पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की, तडीपार असलेला एक इसम गजानन चौक परिसरात फिरत आहे. ही माहिती मिळताच पोलीस पथकाने त्वरित गजानन चौक परिसरात सापळा रचून संबंधित तडीपार इसमाला ताब्यात घेतले.

  ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव तौसिफ उर्फ छोट्या अब्दुल शेख (वय ३२, रा. गोल्डन बेकरीच्या मागे, गजानन चौक, फलटण) असे आहे. त्याला सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुका, तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार असतानाही त्याने आदेशाचे उल्लंघन करून शहरात प्रवेश केल्याने त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस पथकाचे कौतुक:

    ही यशस्वी कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, आणि फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. अरविंद काळे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम, श्रेणी  उपिन भोसले, सपोफौ बारेला, पोलीस हवालदार संतोष नाळे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल बडे आणि पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र टिके यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या