पुतळा परिसरात विद्रुपीकरण नको !!
अनिल वीर
सातारा ,दि.७-: विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३५ व्या जयंतीची धूम सर्वत्र मोठ्या जल्लोषात सुरू आहे.
बौद्ध विकास संघ संलग्न माता रमाई महिला मंडळ यांच्यावतीने आनंदवन बुद्ध विहार ऐरोलो सेक्टर १९ मधील जयंती निमित्त नगरसेवक आकाश मढवी यांच्या हस्ते महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा बॅनरचा उदघाटन सोहळा मोठ्या उत्सहात पार पडला.अशी माहिती भीमराव दाभाडे यांनी दिली.
दरम्यान,येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात गेली तीन वर्षे झाली झाली. विद्रुपीकरण होणार नाही.याची काळजी जबाबदार आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्ते घेत आहेत. सध्या पालिकेतर्फे भव्य-दिव्य सुशोभीकरण व मंडपाचे काम चालु आहे.दि.१० अखेर पूर्ण स्वरुपात काम होईल.कारण, दि.११ रोजी म.जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादानाने सुरुवात होणार आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज