अजित पवारांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ‘समता पतसंस्थेतील’ संशयास्पद व्यवहार; अंजली दमानियांचा गंभीर आरोप




मुंबई,दि.७-:राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या यांनी उपमुख्यमंत्री यांच्या अपघाताच्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी संशयास्पद आर्थिक हालचाली झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.


दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोंदूगिरी प्रकरणात चर्चेत असलेल्या याच्याशी संबंधित ‘समता पतसंस्थेत’ 27 जानेवारी 2026 रोजी 17 मोठे आर्थिक व्यवहार झाले. तर 28 जानेवारी, म्हणजेच यांच्या अपघाताच्या दिवशी 19 व्यवहारांची नोंद झाली. यानंतरही 29, 30 आणि 31 जानेवारी रोजी अनुक्रमे 10, 8 आणि 8 व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.


विशेष म्हणजे, यापूर्वी या पतसंस्थेत महिन्याला केवळ 2 ते 8 व्यवहार होत असत. मात्र अचानक एका-दोन दिवसांतच एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहार वाढल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.


अंजली दमानिया यांनी सांगितले की, “हा संपूर्ण तपशील मी एसआयटीकडे सादर करणार आहे. या व्यवहारांमागे नेमके कोण आहे, पैशांची फिरवाफिरवी झाली का, आणि या सर्वाचा अपघाताशी काही संबंध आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.”


दरम्यान, यांच्या अपघाताला दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला असला तरी, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात होता की घातपात, याबाबतचा गूढ कायम आहे.


या नव्या आरोपांमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले असून, तपास यंत्रणांवर सत्य समोर आणण्याचा दबाव वाढला आहे. राज्यातील जनतेचे लक्ष आता या तपासाकडे लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या