बारामतीत काँग्रेसची माघार; पोटनिवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट!



बारामती,दि.९- : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने अखेर माघार घेत मोठा राजकीय धक्का दिला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेत सावध पाऊल टाकले असून, या निर्णयामुळे निवडणुकीचे समीकरणच बदलले आहे.

उपमुख्यमंत्री यांच्या उमेदवारीमुळे आधीच चर्चेत आलेल्या या निवडणुकीत बिनविरोध लढतीची शक्यता आता अधिक बळावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीकडून यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती.

काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीवरून तीव्र अंतर्गत चर्चा सुरू होती. काही नेते लढाईच्या भूमिकेत होते, तर काहींनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून माघार घेण्याचा सल्ला दिला. अखेर या मतभेदांवर पडदा टाकत पक्षाने माघारीचा निर्णय घेतल्याचे समजते.

दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांच्यात झालेल्या चर्चेनंतरच हा निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चेत बारामतीतील निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्याचा प्रयत्न झाल्याचेही बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, ने याआधी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र काँग्रेसच्या माघारीमुळे हा पाठिंबा निष्प्रभ ठरल्याचे चित्र आहे.

आता काँग्रेसच्या या निर्णयामुळे बारामती पोटनिवडणुकीत महायुतीला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील राजकीय घडामोडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या