सोनकसवाडी ,दि.११- : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत सोनकसवाडी येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी सरपंच सौ. राणी सतीश कोकरे, उपसरपंच सतीश घुले, ग्रामपंचायत सदस्य नितीन लोखंडे, गणपत कोकरे, तसेच प्रगतशील शेतकरी सतीश कोकरे, रोहन गायकवाड, राजेंद्र कोकरे, सुनील जेधे, बापू सुरवसे, महेश गायकवाड, समीर गायकवाड आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत समाजातील शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली. कार्यक्रम शांत व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज