अनिल वीर
सातारा,दि.३- : आधुनिक काळात पत्रलेखन लोप पावत चालले आहे.मोबाईलचा जमाना असल्याने पत्र सोडा बोलणेही दुर्मिळ झालेले आहे.तेव्हा आज खरोखच पत्रलेखन उपक्रम चालु ठेवणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन श्रीमंत सौ.वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
येथील अश्वमेध महिला मंच आणि अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै.सारिका मोहिते- यादव स्मृतिप्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या 'एक पत्र तिच्यासाठी' या पत्र लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून त्याचे वितरण पाठक हॉलमध्ये वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.तेव्हा त्या बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या," मी बोर्डिंगमध्ये असताना आईचे पत्र यायचे.आपल्या काळात पत्राचा जमाना होता.आता रो प्रकार आढळुन येत नाही.तेव्हा हा उपक्रम निरंतर संयोजकांनी चालू ठेवावा. विशेषतः बायोकालाही पत्र लिहिण्याचा हट्टही आयोजकांनी करावा."
यावेळी परीक्षक व विजेत्यांनी मनोगत व्यक्त केली.
महिला दिनानिमित्त आपल्या
आयुष्यात ज्या स्त्रीने प्रेम, आधार आणि प्रेरणा दिली. त्यामुळे आयुष्य समृद्ध केले. त्या स्त्रीला शब्दांची भेट देवून आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची नामी संधी अश्वमेध महिला मंच आणि अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले. त्यास सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.एकूण ६७ पत्रे या स्पर्धेसाठी प्राप्त झाली. त्यातून डॉ. आदिती काळमेख व पद्माकर पाठकजी यांनी त्यांचे परिक्षण करून सहा पत्रांची निवड केली. त्यामध्ये कुटुंब समृद्ध करणारे पत्रासाठी रवी इनामदार, सर्वोत्कृष्ट भावनिक
पत्रासाठी मदन देवी, सातारा सर्वोत्तम हृदयस्पशी पत्रासाठी दिपक डफळे, सातारा सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी पत्रासाठी किरण तावरे, अनित जाधव व प्रज्ञा रोकडे यांची निवड करण्यात आली होती.त्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, पुस्तक आणि पुष्पगुच्छ देवून गौरवण्यात आले. ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने यांनी स्वागत केले.आयोजक रवींद्र झुटिंग यांनी प्रस्ताविक केले.उपाध्यक्ष डी. एम. मोहिते,अश्वमेध महिला मंचाच्या अध्यक्षा रोहिणी कुंदप आदींनी स्वागत केले.वैद्यही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सदरच्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, स्पर्धक,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज