सांगली पेटली! आंबेडकर जयंतीत विटंबना; कार्यकर्त्यावर कुराडीने जीवघेणा हल्ला – आरोपीवर संतापाचा स्फोट

 महामानवाच्या प्रतिमेचा अपमान; हल्लेखोराचा थरार – कायदा-सुव्यवस्थेला उघड आव्हान







सांगली | दि. १६ एप्रिल २०२६

अष्टविनायक नगर (श्रमिक नगर), सांगली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान घडलेल्या संतापजनक आणि धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण सांगली जिल्हा संतप्त झाला आहे. एका व्यक्तीने महामानवांच्या प्रतिमेसमोर अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्याला रोखणाऱ्या कार्यकर्त्यावर थेट कुराडीने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी रात्री सुमारे ९ वाजता जयंती मिरवणूक उत्साहात सुरू असताना गणेश मनोहर पुजारी या आरोपीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर लावलेल्या शुभेच्छा डिजिटल बोर्डजवळ जाऊन सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे उपस्थित नागरिक आणि कार्यकर्ते संतप्त झाले.


कार्यकर्त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने शिवीगाळ करत दादागिरी केली आणि वातावरण आणखी तणावपूर्ण केले.

घटनेने भीषण वळण घेतले, जेव्हा आरोपीने आपल्या वाहनातून धारदार कुराड आणली आणि कार्यकर्ता रोहित हिरामण भगत यांच्यावर थेट हल्ला करण्यासाठी धाव घेतली. प्रसंगावधान राखत भगत यांनी आरडाओरडा करत स्वतःचा जीव वाचवला. अन्यथा ही घटना मोठ्या जीवितहानीत रूपांतरित झाली असती, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची जाणीवपूर्वक विटंबना अनुसूचित जाती समाजाच्या भावना दुखावल्या असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा कट

सार्वजनिक शांततेचा भंग आणि कायदा-सुव्यवस्थेला उघड आव्हान

देऊन कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केला असून 

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन आणि सम्यक विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. संजय गांधी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहिता (BNS 2023) अंतर्गत कठोर कलमे लागू करावीत

हत्या करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवावा

SC/ST अत्याचार प्रतिबंध कायदा तात्काळ लागू करावा

आरोपीला तात्काळ अटक करून न्यायालयीन कोठडी द्यावी

पीडित व साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्यावे 

या घटनेचे अनेक साक्षीदार पुढे आले असून, त्यामध्ये रोहित भगत (पीडित), सिद्धार्थ ठोके, सुमित धुळे, हिरामण भगत, यश काळे, सुजल कांबळे, सचिन कांबळे, प्रकाश दोडमणी, विश्वजित काकडे, संदीप माळी यांचा समावेश आहे.

या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कारवाई न झाल्यास सांगली जिल्ह्यात व्यापक आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.


 “कायद्याचा धाक संपत चाललाय का? दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर अशा प्रवृत्तीला खतपाणी मिळेल,” असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या