बारामती,दि.१६- : विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीत कार्यकर्त्यांची बूथनिहाय महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर आणि मनमोकळा संवाद साधत स्थानिक पातळीवरील तयारीचा आढावा घेतला.
यावेळी अजित दादा पवार यांच्या विचारांचा उल्लेख करत “कार्यकर्ते हे पक्षाचा कणा आहेत” ही भूमिका अधोरेखित करण्यात आली.
सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आवाहन केले की, येत्या २३ एप्रिल रोजी जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी प्रत्येक बूथवर नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने काम करावे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी ओळखून घराघरात पोहोचावे, मतदारांशी थेट संवाद साधावा आणि पक्षाचे विचार प्रभावीपणे मांडावेत, असे त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांची मेहनत, समन्वय आणि सकारात्मक दृष्टिकोन हाच विजयाचा पाया ठरेल, असा विश्वास व्यक्त करत अजितदादांच्या स्वप्नातील प्रगत आणि विकसित बारामती घडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार करण्यात आला.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज