पाटस (ता. दौंड)दि.१-: प्रतिनिधी
पाटस येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या फलकाची अज्ञात समाजकंटकांकडून करण्यात आलेली तोडफोड ही अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून इतिहासाचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा विविध संघटनांकडून देण्यात आला आहे.
या प्रकरणी दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आज पोलिस प्रशासनाकडे धडक देण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे आणि युवक अध्यक्ष सुधीर दादा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पोलिस उपमुख्यालय बऱ्हाणपूर-बारामती येथे भेट देत अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांना लेखी निवेदन सादर केले.
यावेळी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, या गंभीर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची ठाम मागणी करण्यात आली. पोलिस प्रशासनानेही या घटनेकडे गांभीर्याने पाहून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणामुळे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या वेळी बारामती तालुका अध्यक्ष महेंद्र भंडलकर, सरपंच किसनराव बोडरे, चांगदेव बापू भंडलकर, विजय शिरतोडे, अनिल मदने, योगेश मदने, नितीन माकर, नंदकुमार मदने, नरेश खोमणे, विजय भंडलकर, प्रकाश खोमणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
⚠️ इशारा:
“महापुरुषांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; दोषींना तात्काळ शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा रस्त्यावर उतरू!”



0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज