सम्राट अशोक धम्मभूषण पुरस्कार किरण माने यांनी दि.११ रोजी वितरण



अनिल वीर

सातारा,दि.९-: विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सम्राट अशोक धम्मभूषण पुरस्कार अभिनेते किरण माने यांना वितरण शनिवार दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सात वाजता देगांव क्रीडासंकुल जवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य प्रवीण धस्के यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होणार आहे.

   यावेळी ,'शिवराय ते भिमराय’ या विषयावर व्याख्यान प्रा. विक्रम कदम यांचे होणार आहे.तेव्हा संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहून लाभ घ्यावा.असे आवाहन संयोजक पंचशील बुद्धविहार नियोजन समिती, चक्रवर्ती सम्राट अशोक विचार मंच व युवा संघर्ष समिती यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या