तामिळनाडूत दलितांचा द्रमुकला धक्का; एनडीएचा विजय पक्का




चेन्नई/मुंबई, दि. १६- : तामिळनाडूमध्ये सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले असून ते रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी केली. तामिळनाडूच्या विकासासाठी शिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या निवडणुकीत दलित समाज द्रमुकला धक्का देईल आणि एनडीएचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला.

चेन्नई येथे रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी व एनडीएच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

तामिळनाडूत रिपब्लिकन पक्षाचे एकूण १८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यापैकी ५ उमेदवार चेन्नई शहरातून निवडणूक लढवत आहेत. या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आठवले यांनी चेन्नई दौरा केला. एकमोर येथे झालेल्या सभेत कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.

तामिळनाडू अजूनही विकासापासून वंचित असल्याचा आरोप करत, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एनडीए सरकारची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशात विविध विकासकामे आणि जनकल्याणकारी योजना राबवल्या असून ईशान्य भारतातही मोठ्या प्रमाणात विकास झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.

दक्षिण भारतातही अशाच प्रकारचा विकास होऊ शकतो, यावर जनतेचा विश्वास बसला असून यंदा तामिळनाडूत भाजप-प्रणित एनडीएचा मोठा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच रिपब्लिकन पक्षाचे निवडून येणारे उमेदवार एनडीएला सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही त्यांनी सांगितले.

हेमंत रणपिसे, प्रसिद्धीप्रमुख यांनी प्रसिद्धीस दिले 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या