फलटणमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर उद्या 'शांतता कमिटी'ची फलटण शहर पोलीस ठाण्यात बैठक; प्रशासनाचे जय्यत नियोजन!

फलटण: [प्रतिनिधी] दि. 15 एप्रिल 2026

आगामी १९ एप्रिल २०२६ रोजी होणारा शिवजयंती महोत्सव शहर व परिसरात उत्साहात आणि शांततेत साजरा व्हावा, यासाठी फलटण पोलीस प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. या उत्सवाच्या पूर्व नियोजनासाठी उद्या, गुरुवार दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता फलटण शहर पोलीस ठाणे येथे 'शांतता कमिटी'ची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) फलटण उपविभाग आणि मा. तहसीलदार साहेब, फलटण हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. शिवजयंती मिरवणूक आणि कार्यक्रमांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे यांच्या वतीने शहरातील सर्व स्तरांतील घटकांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे, त्यामध्ये प्रामुख्याने:

सर्व तरुण मंडळे व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी.

नगरसेवक व सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी.

जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक.

पत्रकार, उद्योजक आणि व्यावसायिक.

पोलीस पाटील.

बैठकीचा तपशील:

स्थळ: फलटण शहर पोलीस ठाणे.

दिनांक: १६ एप्रिल २०२६.

वेळ: सायंकाळी ४:३० वाजता (१६:३० वा.)

शिवजयंतीचा उत्सव आदर्शवत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी सर्व संबंधित प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन फलटण शहर पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या