कॅप्टन साहेबराव बनसोडे पुरस्काराने चंद्रकांत खंडाईत सन्मानीत




सातारा,दि.२६- : संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने पुरोगामी विचार व चळवळीत मौलिक योगदान देणाऱ्या कार्यकर्त्याच्या गौरवार्थ दिल्या जाणाऱ्या कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता १७ वा. पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांना येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये डॉ.शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

     संबोधी प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य दिवंगत सामाजिक कार्यकर्ते कॅप्टन साहेबराव बनसोडे यांच्या जन्मदिनी संघटक दिनकर झिंब्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

     प्रथमतः कॅप्टन साहेबराव बनसोडे व महापुरूष यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.अध्यक्ष इंजि.रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले.

            चंद्रकांत खंडाईत गेल्या चाळीस वर्षापासून सामाजिक, राजकीय व धम्म चळवळीत कार्यरत आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १८९६ ते १९०४ या कालावधीत बालपणी कुटुंबीयासमवेत येथील सदरबझार परिसरातील पारशी आग्यारी समोरील ब्रिटिश काळात बांधलेल्या निवासस्थानी वास्तव केले होते. हे घर महाराष्ट्र सरकारने ८ मार्च २००७ रोजीच्या राजपत्राद्वारे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.सदरचे स्मारक होण्यासाठी चंद्रकांत खंडाईत अनेक वर्षापासून लढा देत आहेत.मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन,खैरलांजी हत्याकांड,अन्याय- अत्याचाराच्या विविध आंदोलनात व लोकांच्या विविध प्रश्नांवर जन आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग दिला होता. धम्म परिषद तसेच समाज प्रबोधनाचे अनेक उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत.

      यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. प्रशांत साळवे,कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे, सहकार्यवाह डॉ. सुवर्णा यादव, विश्वस्त डॉ. जयपाल सावंत,अनिल बनसोडे, केशवराव कदम,प्रकाश गायकवाड,अशोक कांबळे, अशोक भोसले,सर्व विश्वस्थ, सदस्य,यशपाल बनसोडे,त्यांचे बंधू व सर्वच परिवार, चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या