शेतकरी संघटनेचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपन्न

 


अनिल वीर

सातारा ,दि.२६- : जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांना जागे व्हा... असे म्हणत, "सामाजिक संघटना व शेतकरी संघटनेचे नुकतेच धरणे आंदोलन झाले.

                सहकारला लागलेली भ्रष्टाचाराची कीड,बंद पडणाऱ्या बँका-पतसंस्था व बँकामधील संचालकांचे गैरव्यवहार याबाबत चौकशी करावी.बँका पतसंस्था संचालकांच्या कोट्यावधी रुपयाच्या मालमत्ता व उद्योग हे गोरगरीब कर्जदाराचे शोषण करतात.शिवाय,ठेवीदारांच्या ठेवी बुडवलेले आहेत.तेव्हा त्याची ईडी, प्राप्तिकर खातेमार्फत तात्काळ चौकशी करावी.अशी मागणी केली आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे पाटील, महिला आघाडीच्या आक्रमक नेत्या रंजनाताई पाटील, बैलगाडी शर्यत लढ्याचे नेते धन्यकुमार जाधव (तात्या ), सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत देशमुखे,जिल्हा संघटक अशोकराव पाटील,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते रतन पाटील,उत्तमराव पोळ,रूपाली पोळ,माजी सरपंच वसंतराव चव्हाण नाना, आनंदराव थोरात, कराड तालुकाध्यक्ष विनायक जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घारे पाटील, बाळासाहेब पवार, शिवराष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पवार (भाऊ), बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव खबाले अण्णा,सामाजिक कार्यकर्ते उद्देश माने, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र येळवे बापू,एम.के. बाबर, अपंग जनता दल जिल्हाध्यक्ष असलम आंबेकरी कालेकर,तात्या पाटील, माजी तालुकाध्यक्ष प्रवीण उथळे पाटील आदी सर्व संघटना- पदाधिकारी यांनी जिल्हा उपनिबंध कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.तेव्हा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, कराड सहकार उपनिबंधक अपर्णा यादव यांनी सर्व संघटना पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलवले. यावेळी शेतकरी संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी विविध संस्थांमध्ये कसे गैरव्यवहार घोटाळे व भ्रष्टाचार होतात? लूट होते? व कर्जदाराची पिळवणूक करून मालमत्ता गिळंकृत केल्या जातात. सोसायटीचे सचिवच कर्ज घेऊन माफ करून घेतात.बेकायदेशीर लीलाव-जप्ती होते. यासंबंधी उदाहरणे व दाखले दिले.

     तात्काळ संबंधित कर्जदार व जामीनदार यांना ज्या बँका व पतसंस्था कर्ज विषयक कर्ज अदा तारखेपासून चालू तारखे अखेर पूर्ण माहिती,ठेवीची माहिती, कर्ज खाते उतारा वगैरे सही शिक्क्याचे कागदपत्र देत नसतील.त्यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारीप्रमाणे तात्काळ काय व कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल करणार ? त्याची माहिती द्यावी.आर्थिक घोटाळे केलेल्या बँका,पतसंस्थांच्या ठेवी ठेवीदारांना कधी मिळणार ? व संचालकांच्या विरुद्ध गुन्हे कधी दाखल करणार?तसेच मुदत बाह्य कालबाह्य झालेल्या व ज्या वसूल दाखलेला बारा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. त्या सर्व कर्जदारांचे जामीनदारांची कर्ज माफ करून संचालक मंडळाच्या मालमत्तेतून कर्जाची वसुली करण्यात यावी. बेकायदेशीर कर्जामधून इमारत निधी, प्रतिष्ठान, स्वयम रोजगारकरिता रकमा सक्तीने घेणाऱ्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल करावेत.प्रतिष्ठान व स्वयंरोजगार संस्थेची तात्काळ सखोल चौकशी करावी. प्राप्त तक्रारीप्रमाणे सर्वच कर्ज प्रकरणाचे स्वतंत्र लेखापरीक्षण टेस्ट ऑडिट करावे. चाचणी लेखापरीक्षण करावे व ज्यादा तक्रारी असणाऱ्या संस्थांची सहकार कायद्याचे कलम 83 व 88 अन्वये सखोल चौकशी होऊन संचालक बोर्ड व दोषी पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत. लाखो रुपयाच्या वीना तारण दिलेल्या कर्जाची वसुली संचालक मंडळाच्या मालमत्तेतून करण्यात यावी. जिल्ह्यातील बँका व पतसंस्था, बेकायदेशीर काम करणारे व स्वतःच्या मालमत्ता वाढवणारे संचालक मंडळ व विशेष वसुली अधिकारी यांच्याविरुद्ध काय व कोणती कारवाई केली ? यासंबंधी दहा दिवसाच्या आत पूर्ण माहिती द्यावी.न मिळाल्यास दि.७ एप्रिल रोजी पुन्हा शेतकरी संघटना व सर्व सामाजिक संस्था संघटना सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिया व धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलेला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या