सह्याद्रीत पुणे जिल्हा परिषदेचा सन्मान; सुनेत्रा पवारांकडून अधिकाऱ्यांचे कौतुक




मुंबई,दि.२८- : राज्यातील ई-गव्हर्नन्स सुधारणा आणि सेवाकर्मी उपक्रमांतर्गत झालेल्या विशेष कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषदेच्या कार्याची दखल घेत ‘सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान  यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री गेस्ट हाऊस येथे प्रदान करण्यात आला.


या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गजानन पाटील यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. त्यांनी आपल्या संदेशात पुणे जिल्हा परिषदेच्या कार्याचा विशेष उल्लेख करत प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख बनत असल्याचे नमूद केले.


सुनेत्रा पवार यांनी राज्यातील या उपक्रमांतर्गत पुरस्कार प्राप्त झालेल्या सर्व अधिकारी व संबंधित कार्यालयांचेही अभिनंदन केले. “अधिकाऱ्यांच्या कार्यशीलतेमुळे प्रशासनात सकारात्मक बदल होत असून, जनतेला अधिक प्रभावी सेवा मिळत आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


तसेच त्यांनी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारांचा उल्लेख करत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्याने विकासाची वाटचाल केली असल्याचे अधोरेखित केले. पुणे जिल्हा परिषदेने मिळवलेले हे यश त्यांच्या दूरदृष्टीचे फलित असल्याचेही त्यांनी नमूद केले.


या यशामागे प्रशासनाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी असल्याचे सांगत, पुणे जिल्हा परिषदेचे उपक्रम इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


शेवटी, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या